अंबरनाथ

अंबरनाथ मध्ये बोगस कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, पाच अटक

अंबरनाथ , दि . २६ प्रतिनिधी : अंबरनाथ शहरात बोगस कॉल सेंटरचा पोलिसानी पर्दाफाश केला असुन मोबाईल वरुन अमेरिकीच्या नागरिकाना कॉल करुन सॉप्टवेअर डेव्हलप करन्याच्या बहाण्याने त्या नागरिकांची फसवणुक केल्या प्रकरणी त्या कॉल सेंटरवर अंबरनाथ पोलिसानी छापा मारुन पाच जणाना अटक केली असुन त्यांच्याकडुन विविध साहित्य हस्तगत केले आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील ग्लोब बिझनेस पार्क मधील तिसऱ्या माळ्यावर रुद्र टेक सर्व्हिस सेंटर मध्ये कॉल सेंटर हे अनधिकृत पणे चालत असल्याची माहीती अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाब्बिर सय्यद यांना मिळाली असता त्यांनी त्या सेंटरवर छापा मारला . त्या सेंटरचा मालक कमलेश सुनिल सचवानी यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह स्वताच्या फायद्यासाठी मोबाईल फोन वरुन सॉप्टवेअर, व संगणक इंटरनेट चा इत्यादी साधनाचा वापर करुन अमेरिका येथील नागरिकाना सॉप्टवेअर डेव्हलप करुन विकन्याच्या बहाण्याने त्यांना विश्वासात घेवुन त्यांच्या कडुन ५० ते २०० डॉलर बीट कॉईन स्कॅनर मार्फत स्विकारुन त्या नंतर त्यांचा संपर्क क्र . ब्लॉक करुन त्यांची आर्थिक फसवणुक करत असल्याचे निदर्शनास आले.

तेव्हा पोलिसानी रुद्र सर्व्हिस सेंटरचा मालक कमलेश सुनिल सचवानी , तरुण हरेश केवलानी ( डेटा विश्लेषक ) यश राजु पाटील ( कस्टमर कॉलिंग करणारा ) हितेश संतोष पंजाबी , वरुन विनोद मिश्रा यांच्यावर पोलिस उपनिरीक्षक शाहु पोपट काळदाते यांच्या तक्रारीवरुन कलम ३१८ (४ ) ३१९ – ६० ,३ (५ ) सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ४३ – ६६ ( ड ) ६६ – ७५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन या पाच ही जणाना अटक केली आहे . यांच्या कडुन विविध साहित्य हस्तगत केले आहे . तर या गुंह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाब्बिर सय्यद हे करत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *