अंबरनाथ

अंबरनाथ पुर्व व पश्चिम स्मशानभुमीतील शवदाहिनी धुळखात

अंबरनाथ , दि . २३ प्रतिनिधी : अंबरनाथ शहरात पर्यावरणपूरक प्रकल्पाच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या शवदाहिन्या आज धूळ खात पडल्या आहेत, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब असुन या बाबत नगराध्यक्ष तेजश्रीताई करंजुले यांना समाजसेवक हसमुख हरिया यांनी लेखी निवेदन देवुन दोन्ही स्मशानातील शवदाहीन्या दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

अंबरनाथ पूर्वेकडील तांत्रिक चुकीमुळे बंद असलेली शवदाहिनी तसेच अंबरनाथ पश्चिमे कडील गॅस (LPG) शवदाहिनी या दोन्ही प्रकल्पांचा आजपर्यंत नागरिकांना कोणताही लाभ मिळालेला नाही._
जनतेच्या कर रूपाने जमा झालेल्या पैशाची अशी उघड उधळपट्टी होणे अंबरनाथकरांसाठी अतिशय खेदजनक आहे.
हे प्रकल्प आतापर्यंत सुरू होणे अपेक्षित असताना संबंधित कंपन्यांच्या तांत्रिक त्रुटींमुळे दोन्ही प्रकल्प निष्क्रिय अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्रीताई विश्वजीत करंजुले पाटील यांना समाजसेवक हसमुख हरिया यांनी निवेदन दिले असून त्यांनी तात्काळ पाहणी करून पुढील आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या प्रकरणात ज्यांच्या कडून हलगर्जीपणा झाला आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *