अंबरनाथ , दि . १७ प्रतिनिधी : अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव येथील रिलायन्स रेसिडेन्सी समवेत असंख्य इमारतीत कामगार कर्मचारी, अधिकारी, आणि मोठ्या प्रमाणात दुकानदार वास्तव्य करीत असून या भागात दळणवळणा ची कोणती ही पर्याप्त व्यवस्था नसल्याने उल्हासनगर च्या परिवहन विभागा च्या वतीने सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी महापालिका आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे आणि महापौर अश्विनी निकम यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव परिसरात जवळपास दोनशे रहीवाशी संकुल आहेत. या भागातील हजारो रहिवाशी दररोज उल्हासनगर अंबरनाथ कल्याण शहरात कामा निमित्त ये जा करीत असतात. येथे फक्त रिक्षा चालतात त्यांचे अवाढव्य भाडे नागरिकांना परवडत नसल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . या भागातील समाजसेवक प्रल्हाद नागदेव पंडित यांच्या नेतृत्व खाली भीमराव वाघमारे, भिका सोनवणे ,उत्तम बंगाळे, रोशन पगारे, धम्मपाल तेलगोटे , दिनकर खळे समवेत शेकडो रहिवाशी यांनी आज महापालिका आयुक्त यांना निवेदन देऊन बस सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. या बाबत परिवहन सेवे चे व्यवस्थापक विनोद केणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की उल्हासनगर परिवहन सेवेत आणखीन नवीन बसेस शामिल होणार आहेत . तेव्हा अंबरनाथ मधील अनेक भागात बस सेवा सुरु करण्या साठी शासनाची परवानगी आवश्यक असून काही दिवसात रीतसर या भागात बस सेवा सुरु करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे .




