उल्हासनगर

उल्हासनगर मध्ये डॉंस बार वर पोलिसांचा छापा, १० बार बालासह १२ जण अटक

उल्हासनगर , दि . २६ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ४ येथील श्रीराम चौक येथे रात्रभर सुरु असलेल्या एंजल डॉंस बार वर विठ्ठलवाडी पोलिसानी छापा मारुन मॅनेजर दोन वेटर सह १० बारबालाना अटक केली आहे . हा बार वादग्रस्त असुन गुन्हेगारांचा एक प्रकारे अड्डाचा असल्यामुळे चर्चेत आहे .

उल्हासनगर कॅंप ४ येथील चौकात चार ते पाच डांस बार सुरु आहेत . हे बार रात्रभर सुरु असतात . या बार मध्ये बाहेरचे गुन्हेगार मोठ्या प्रमाणात येतात . याच चौकात असलेला एंजल डांस बार रात्रभर सुरु राहत असल्याची माहीती विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांना मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या पथकासह त्या बार वर छापा मारला त्या छाप्यात बार चा मॅनेजर रफिककुल्ला हरेश शेख, मिनल निवासी वेटर , दिनेश गावडा यांनी आपसात संगनमत करुन ओ शेठ तुम्ही नांदच केला शेठ ,, या अश्लिल गाण्यावर अंगात तोकडे कपडे घालुन नृत्य करुन ग्राहकाना लुभावन्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसुन आले तेव्हा यांच्यावर कारवाई करत अटक केली आहे .

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *