उल्हासनगर

उल्हासनगर मधील प्रलंबित विकासकामांची आयुक्ता कडून पाहाणी, कामांना जलद गती देण्याचे आदेश

उल्हासनगर , दि . २५ प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आयुक्त सौ. मनिषा आव्हाळे यांनी लोकप्रतिनिधींसह विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी कामाचा दर्जा तपासून अधिकाऱ्यांना कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिका आयुक्त सौ आव्हाळे यांनी शिवसेना गट नेते अरुण आशान , नगरसेविका इंदिरा निखिल पाटील, सौ काजल जग्याशी, अमर जग्याशी समवेत महापालिकेच्या अधिकऱ्या सोबत प्रभाग क्रमांक १५ मधील विकास कामांची पाहाणी केली. त्यांनी वाल्मीक नगर येथील समाज ,मंदिर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, गीता कॉलनीतील प्रलंबित रस्ता, श्रीराम नगर ते सतरामदास हॉस्पिटल रस्ता, आणि सूर्या हॉटेल ते खडेगोलवली गावदेवी मंदिर रस्त्याच्या कामाची पाहाणी करताना सतरामदास हॉस्पिटल ते जंगल हॉटेलपर्यंतची पाईपलाईन उद्यान व रस्त्याचे काम जल्द गतीने पूर्ण करण्याचे आदेश अधिकऱ्यांना दिले आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी प्रभागातील रस्ते आणि पाईपलाईनची कामे विहित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. कामात दिरंगाई करणाऱ्यांवर आणि गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असे संकेत आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी यावेळी दिलेआहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *