उल्हासनगर

उल्हासनगर येथे २० जणाच्या टोळक्याने केली वाहनांची तोडफोड, तीन जण अटक

उल्हासनगर , दि . २० प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप १ येथील शहाड जवळ असलेल्या हर्मन मोहता कंपनीच्या गेट समोर मस्सल फॅक्टरी च्या शेजारी उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड काही असामाजिक तत्वाच्या गुंडानी केली आहे. या प्रकरणी जवळपास २० ते २५ जणावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन तीन जणाना अटक केल्याची माहीती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे.

उल्हासनगर महापालिकेची नुकतीच निवडणुक संपन्न झाली आहे. मात्र अख्या निवडणुक कालावधीत कोणता ही गंभीर गुन्हा घडला नाही . दरम्यान निकाल १६ जानेवारी रोजी लागल्या नंतर दोन दिवसानी कॅंप १ येथील हर्मन मेहता कंपनीच्या जवळ असलेल्या मस्सल जिम फॅक्टरी समोर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या वाहनाची तोडफोड करत काही गांव गुंडानी स्थानिक नागरिकाना घराबाहेर पडणे सुध्दा मुश्किल करत दहशत माजवली . या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन तीन जणाना अटक केल्याची माहीती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *