नगरसेवक गणेश सकपाळ यांची वन मंत्र्याकडे मागणी
नवी मुंबई:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात धर्मादाय रुग्णालयात सरकारी योजनांची अंमलबजावणी सक्तीची केली आहे.त्या अनुषंगाने नवी मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांना सरकारी योजनांची अंमलबजावणी सक्तीची करावीच.परंतु त्या पुढे जात खासगी रुग्णालयात देखील सरकारी योजना अनिवार्य करावीत.यामुळे गोरगरीब व गरजू रुग्णांना फायदा होईल.अशी मागणी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक,महापौर सुजाता पाटील,उपमहापौर दशरथ भगत,आयुक्त डॉ.कैलास शिंदे व मनपा सभागृह नेते सागर नाईक यांना निवेदन देऊन केली आहे.
धर्मादाय रुग्णालय व खासगी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा दर हा सारखाच असला पाहिजे.तसेच दोन्हीही प्रकारच्या रुग्णालयात दरपत्रक रुग्णालयाच्या प्रथम दर्शनी भागात प्रसिद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे.जे रुग्णालयात वैद्यकीय समाजसेवक असतात.त्यांना शासकीय योजना संदर्भात अपेक्षित माहिती नसते.त्यामुळे रुग्ण शासकिय योजनांपासून वंचित राहतात.म्हणून त्यांना शासनाने प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच अनेक धर्मादाय रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्ण येतात.परंतु त्यांना थेट त्याच रुग्णालयात असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करतात. यामुळे आर्थिक लूटमार होते.म्हणून प्रथम रुग्ण आल्यावर त्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन शासकीय योजना घ्यायची आहे की,नाही.याबाबत अर्ज भरून घ्यावा.त्यांनी जर ती योजना नाकारली तर खासगी रुग्णालयात दाखल करून घ्या.परंतु रुग्णाला पूर्ण माहिती देणे अत्यंत गरजेचे असून ही प्रकिया अनिवार्य करावे असाही उल्लेख निवेदनात केला आहे.
शहरातील प्रत्येक खासगी व धर्मदाय रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना समजेल व उमजेल अशा प्रकारचा उपलब्ध असलेल्या शासकीय सेवा सुविधा योजना विषयी मोठा फलक लावणे अनिवार्य करावे.तसेच योजनेसंदर्भात माहितीसाठी कोणत्या खिडकीवर जावे.याबाबत ठळकपणे माहिती प्रसिद्ध करावी. .तसेच रुग्णालयात निदान होणाऱ्या रोग,आजारांच्या बाबतीत देखील माहिती द्यावी.त्याचबरोबर ज्या खासगी रुग्णालयात शासकीय योजना कार्यान्वित आहेत.या रुग्णालयांना देखील माहिती प्रसिद्ध करण्याचे आपण निर्देश द्यावेत.अशीही विनंती शेवटी निवेदनातून केली आहे.
‘शासनाकडून सर्वसामान्य रुग्णासाठी भरपूर योजना कार्यान्वित केल्या आहेत.दुर्दैवाने याचा फायदा त्यांना होत नाही.गोर गरीब रुग्णांना फायदा व्हावा.हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमचे नेते गणेश नाईक तसेच इतराना गळ घातली असल्याचे नगरसेवक
गणेश सकपाळ यांनी सांगितले.’




