सर्वसामान्य घटकांमध्ये सोने कसे खरेदी करण्याचा यक्ष प्रश्न,व्यापाऱ्यात देखील चिंता
नवी मुंबई:सोन्या,चांदीचे अलंकार लग्न कार्यामध्ये खरेदी करणे हा आज पर्यंतचा इतिहास आहे.या दागिन्यांना अनन्यसाधारण महत्व आहे.परंतु सोन्याच्या दराने मागील सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात उचल खात दाह ग्रॅमला दीड लाखा रुपयांच्या वर व चांदीने एक किलोला अडीज लाखाच्या वर वधारल्याने चांदीची व सोन्याची आभूषणे खरेदी कशी करायची? अशा प्रकाराचा यक्ष प्रश्न पडत अर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्वसामान्य वधू वरांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.दुसरीकडे ग्राहकांची पाठ फिरली असल्याने नवी मुंबईतील सोन्याच्या व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता पसरली आहे.
उन्हाळा सुरू झाला की,लग्न सराई मोठ्या प्रमाणात सुरू होते.यावर्षी साधारणता ५९ लग्न शुभमुहूर्त फेब्रुवारी ते जून २०२६ पर्यंत आहेत.त्यामुळे साहजिकच नवी मुंबईतील हजारोच्या संख्येने मुल,मुली बाहुल्यावर चढणार आहेत.यानुसार पालकवर्ग देखील लग्न जमवा जमवी चालू आहे तर काहींची लग्ने जमली आहेत.त्यामुळे नवरा नवरीला विविध प्रकारच्या चांदीची,सोन्याची अलंकार बनविण्याची घाई पालक वर्गाकडून दिसून येत आहे.परंतु दिवसेंदिवस चांदी व सोने या दागिन्यांचे भाव भरमसाठ वाढत असल्याने वधू वरांचे जन्मदाते हात आखडते घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लग्न समारंभ बोलले म्हणजे नवरी मुलगी व नवरा मुलासाठी सोन्याची आभूषणे पालकवर्ग आपल्या कुवती प्रमाणे खरेदी करतात.यामध्ये मुलींसाठी सोन्याचे मंगळसूत्र,कानातले डूल,अंगठी यासह इतर विविध आभूषणे ,चांदीचे पैंजणे, फेरवी,जोडवी तर मुलांसाठी सोन्याचे चेन,अंगठी, ब्रेसलेटसह इतर अलंकार खरेदी करतात.यासाठी मोठा खर्च येतो.त्यामुळे सर्वसामान्य वधू व वराचे आई वडील अलंकार खरेदी करण्यास धजावत नसल्याचे चित्र नवी मुंबईत पाहायला मिळत आहे.
आर्थिकदृष्ट्या सबळ नसलेले पालकवर्ग सोने व चांदीचे भाव पाहता आपल्या घरातील जून सोने आहे.ते मोडून नवीन दागिने बनवत आहेत.यामागे नवीन सोने घेणे परवडत नाही.हे सांगण्यात येते.
प्रत्येक पालकवर्गाला नवीन सोने खरेदी करण्याची हौस असते.यामागे आपल्या अपत्य वर असलेले प्रेम कारणीभूत असते.म्हणून ही मंडळी सोन्याच्या दुकानात जातात.परंतु तिघे गेल्यावर ही मंडळी सोन्याचे अलंकार पाहण्याशिवाय काहीही करत नसल्याचे व्यापारी सांगतात.
साधारणता सहा महिन्यापूर्वी सोन्याचा भाव दहा ग्रॅम मागे एक लाखाच्या आसपास होता.आज तोच दर आज १ लाख ५५ हजार रुपयावर थांबला आहे.तर,सहा महिन्यापूर्वीच चांदीचा भाव १ लाख रुपये दहा हजार रुपये एक किलो मागे होता.आजचा दर हा २ लाख ६० हजार रुपये इतका आहे.
मागील सहा महिन्यात सोन्याने आज पर्यंतची सर्वात मोठी उच्चांकी घेत १ लाख ,८२ हजार रुपयांवर पोहचला होता.तर,चांदी एका किलोला ४ लाख,१८ हजार रुपयावर पोहचला होता.इतकी सोने व चांदीनी उचल खाली होती.
“आजच्याघडीला सोने व चांदीचे अलंकार जे आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत.अशा प्रकारचे वर,,वधूचे पालकवर्ग खरेदी करण्यासाठी येतात.ही ग्राहक दुर्मिळ असतात.सोने व चांदीचे दर दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत असल्याने सर्वसामान्य ग्राहक अलंकार करण्यास धजावत नाहीत.त्यामुळे व्यवसाय कसा करायचा ही चिंता आम्हाला लागून राहणार असल्याचे सोने चांदीचे व्यापारी मयूर जैन यांनी सांगितले.




