नवी मुंबई

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नवी मुंबई :जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.भावे येथील कार्यक्रमाकरीता उपस्थित असलेल्या महिलांकरीता पैठणी लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ८ मार्च या दिवशी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरीता विविध स्पर्धा आणि कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या “विविध क्षेत्रात कार्यरत महिलांना पुरस्कार” तसेच महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांनी उत्पादीत केलेल्या साहीत्याची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नमुंमपा कार्यक्षेत्रातील महिलांकरीता ४ ते ६ मार्च या कालावधीत समुह गायन स्पर्धा, महिला भजनी मंडळ भजन स्पर्धा, लहान व्हिडीओ (Short Video) स्पर्धा (विषय महिला सुरक्षितता विषयक जनजागृती, पर्यावरण, शिक्षण), समुह नृत्य स्पर्धा (विषय कोळीनृत्य), समुह नाटीका स्पर्धा व मंगळागौर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धाची प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी वाशी येथील महापालिकेच्या महात्मा फुले स्मृती भवन या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच ८ मार्च या दिवशी रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे दिवशी स्पर्धा पारितोषिक व पुरस्कार वितरण विष्णुदास भावे नाटयगृह या ठिकाणी होणार आहे. स्पर्धा, पुरस्कार आणि विक्री स्टॉल करीता आवश्यक अर्ज सर्व विभाग कार्यालये तसेच सीबीडी येथील समाजविकास विभाग येथे उपलब्ध आहेत.

या स्पर्धाकरीता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २ मार्च असून पुरस्कार आणि विक्री स्टॉल करीता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ४ मार्च असणार आहे. पुरस्कार नामांकन आणि विक्री स्टॉल बाबतची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेची सर्व विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग येथे उपलब्ध असणार आहे.

अधिक माहितीसाठी विभागनिहाय संपर्क क्रमांक बेलापूर मिथून म्हात्रे 9867231403, नेरुळ प्रियंका पाटील 9082311440, वाशी व तुर्भे सुंदर परदेशी 9594841666, कोपरखैरणे व घणसोली दादासाहेब भोसले 9372106976, ऐरोली व दिघा दशरथ गंभिरे 9702309054

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *