पनवेल

पनवेल शहर वाहतूक शाखेतील ‘त्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान

पनवेल दि. २४ ( वार्ताहर ) : पनवेल शहर वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई पोलिस आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे .
पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्याने वाहतूक पोलिसांनी केलेल्या एका कारची तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर पिस्तूल आढळून आले. हे पिस्तूल त्यांनी जप्त केले. तसेच दुसऱ्या कारवाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केलेल्या वाहन तपासणीत एका दुचाकीच्या डिकीतून गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत पनवेल वाहतूक शाखेचे व.पो.नि. औदुंबर पाटील, पीएसआय. जीवन शेरखाने, पो.ह. आमिर मुलाणी, युवराज येळे, पो.ना. राकेश राजपूत, पो.काँ. महेंद्र बुट्टे यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शहरभरातून कौतुक होत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *