बदलापूर

‘हिंद दी चादर’ समूहगायनाची वर्ल्ड रेकॉर्ड नोंद; ११ हजार विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

बदलापूर, दि.२४,प्रतिनिधी:“समूहगायनाच्या माध्यमातून ‘हिंद दी चादर’ गुरु तेग बहादूर यांच्या महान बलिदानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल,” असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त कोकण विभागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य समूहगान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून Best of India Records या संस्थेकडून नोंद करण्यात आली आहे.

कुळगाव-बदलापूर नगरपरिषद अखत्यारितील सर्व खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये सकाळी ९.०० वाजता एकाच वेळी हे विशेष समूहगान आयोजित करण्यात आले. शासकीय व खासगी शिक्षण संस्थांतील सुमारे ११ हजार विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेले ‘हिंद की चादर’ हे गीत एकसुरात सादर केले आहे.
यावेळी नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा त्याग, शौर्य आणि मूल्याधिष्ठित जीवन नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचते. धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी गुरु तेग बहादूर यांनी दिलेले बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. या ऐतिहासिक उपक्रमात
सहभागी झालेल्या सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि प्रशासनाचे त्यांनी आभार मानले.
यावेळी नगराध्यक्षा सन्माननीय रुचिता घोरपडे, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर, इतर अधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *