बदलापूर

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बदलापूर, दि.१२,प्रतिनिधी:दि. १२/०१/२०२६ रोजी कुळगांव–बदलापूर नगरपरिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक, नव निर्वाचित नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे व उपनगराध्यक्षा प्रियांका आशिष दामले, तसेच मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम श्रद्धा, उत्साह व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *