नवी मुंबई :लोकशाहीचा आत्मा हा मतदार समाजाला जातो.त्यांच्या प्रति कृतज्ञता उत्सव सोहळा घणसोली गावात सायंकाळी सात ते रात्री दहा दरम्यान पार पडला.यावेळी हजारो मतदारांनी भाजपच्या चारही नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेवकांचे सन्मान व सत्कार करण्यात आला.तसेच मतदारांसाठी भोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते.यावेळी चार हजार पेक्षा जास्त मतदारांनी उपस्थिती दर्शविली.
घणसोली येथील समर्थ नगर येथील प्रवेश द्वराच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानावर मतदार कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मतदारांनी प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे सत्कार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पुष्प गुच्छ,शाल,श्रीफळ आणू नयेत.अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले होते.त्या बदल्यात पेन,पेन्सिल,झाडे आणण्याचे आवाहन नवनिर्वाचीत नगरसेवक गणेश सकपाळ यांनी केले होते.या आवाहनाला देखील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक गणेश प्रकाश सकपाळ,नगरसेविका माधुरी किसनदेव हरिजन, ललिता घनश्याम मढवी व अंजना दिलीप म्हात्रे यासर्व नवनिर्वाचित नगरसेविका व नगरसेवकांचे नागरी सत्कार सोहळा पार पडला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सावंत,गणेश खापके, मंगेश साळेकर मयूर जैन, कल्पेश म्हात्रे, रवींद्र राजीवडे सचिन जाधव, संजय क्षीरसागर, प्रीतेश गायकवाड, सुनील साळेकर, करण म्हात्रे, हर्षल म्हात्रे, निखिल म्हात्रे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.




