अंबरनाथ

अंबरनाथ मध्ये घरपट्टी थकबाकीदारां साठी “अभय योजना” लागू

अंबरनाथ , दि . २८ प्रतिनिधी : अंबरनाथ शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषद प्रशासनाने “अभय योजना” राबविण्याचा निर्णय घेतला असून ही योजना ३१ मार्च पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. तेजश्री करंजुले यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत थकबाकीदार नागरिकांना मूळ एक रकमी कर रक्कम भरण्यावर शास्तीमध्ये ५०टक्के सवलत देण्यात येणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा , सौ. तेजश्री करंजुले-पाटील यांच्या कडून करण्यात आले आहे.

अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित करदात्यांनी नगरपरिषदेच्या मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधावा. अथवा नगरपरिषदेच्या https://mahaulb.in/PortalSite/#/app/home या अधिकृत संकेत स्थळावर जावून आपली थकबाकी रक्कम जमा करावी. या अभय योजनेमुळे नागरिकांवरील आर्थिक भार कमी होऊन, कर वसुलीला प्रोत्साहन मिळून नगरपरिषदेच्या महसुलात वाढ होण्यास मदत होणार असून अंबरनाथ शहरातील सर्व थकबाकीदार नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा व आपली थकबाकी ३१ मार्च, २०२६ पर्यत भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा , सौ. तेजश्री करंजुले-पाटील यांनी केले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *