अंबरनाथ , दि . २७ प्रतिनिधी : महिला बालविकास समिती मार्फत महिला सक्षमिकरण योजना राबविणार असून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा माझा मानस आहे असे उद्घार अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी सर्कस मैदान, अंबरनाथ येथे महिला शिलाई प्रशिक्षण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना काढले.
श्रमिक महिला मंडळ संचलित महिला शिलाई प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले असून तीस शिलाई मशीन या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. नागपंथी डवरी गोसावी सेवा संस्थाचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या मार्गदर्शना खाली भटक्या विमुक्त समाजातील महिलांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे असे प्रतिपादन श्रमिक महिला मंडळाच्या अध्यक्षा ऍड मनिषा झेंडे यांनी केले.
या प्रसंगी मंत्रालयातील माजी उप सचिव कैलास भंडालकर, डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल हंडोरे, नगरसेवक विश्वजित करंजुले आदि. विविध संस्था संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.




