उल्हासनगर , दि . ७ प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व मा. आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे यांच्या निर्देशानुसार शहरातील निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार व खर्च प्रतिनिधी यांना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतचे प्रशिक्षण हे जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉल येथे देण्यात आले आहे.
यावेळी निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार तसेच त्यांचे खर्च प्रतिनिधी यांना खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा अधिकारी श्री किरण भिलारे यांनी प्रशिक्षण दिले. या प्रसंगी श्री अभिजीत पिसाळ, मुख्य लेखा परिक्षक, श्री विलास नागदिवे, उपमुख्य लेखा परिक्षक व श्री संजय वायदंडे तसेच खर्च विषयक कामकाज पाहणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या खर्च विषयक तरतूदींबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.



