टॉप स्टोरी महाराष्ट्र

छत्रपती संभाजी पुस्तकातील चुका सुधारण्याचे तयारी- विश्वास पाटील

छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी ( सातारा) दि: छत्रपती शिवरायांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत संभाजी हे पुस्तक २००६ साली प्रकाशित झालेले होते. दोन ते तीन पिढ्यातील वाचकांनी या पुस्तकाला उदंड प्रतिसाद दिला आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना या पुस्तकाबद्दल अनावदनाने माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती मोठ्या मनाने तात्काळ मागे घेण्याची माझी तयारी अशी सावध भूमिका सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले.

साताऱ्यातील साहित्य नगरीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संभाजी या कादंबरी बाबत घेतलेली भूमिका आणि आंदोलनाचा दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या संमेलनाच्या माध्यमातून काही विपरीत घडू नये म्हणून प्रशासन व पोलीस यंत्रणेने खूप काळजी घेतली होती. वाद वाढू नये यासाठी विश्वास पाटील यांनी मवाळ भूमिका घेत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आतापर्यंत साडेतीन हजार प्रतीचे वितरण झालेले आहे छत्रपती संभाजी राजे हे माझ्या काळजाचे बळ आहे. तरीही या कादंबरी बाबत काही आक्षेप असेल तर त्याबाबत चर्चा करून आपण हा प्रश्न निकाली काढू शकतो. असे सांगून संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना संवाद साधण्याचे आवाहन केले.

याच वेळी संमेलनाने मराठीला काय दिले भारतीय संविधानातील मूळ तत्वाचे रक्षण करण्याचा ठराव संमेलन होणार का? मराठी शाळा बंद पडले असून त्यासाठी संमेलनात काय चर्चा होणार असा प्रश्न करून प्राकृतिक साहित्य पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन केले. या वेळेला अनेक मान्यवरांनी त्यांना पाठिंबा दिला. सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात साहित्यक व वाचकांची गर्दी उसळली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सर्व यंत्रणा मराठी साहित्य परिषद पुणे शाखेकडे असल्यामुळे काही साहित्यिकांना गैरसोईला तोंड द्यावे लागले. अशी माहिती साताऱ्यातील साहित्यिकांनी दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *