उल्हासनगर

उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापौर यांचा अधिकृत हेल्पलाइन नंबर जारी ; आता समस्या सोडवण्यासाठी महापौर आपल्या दारी

उल्हासनगर , दि . ८ प्रतिनिधी : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर सौ. अश्विनी कमलेश निकम यांनी शहरातील नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकृत हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. आता कोणत्याही नागरिकांना या हेल्पलाइन नंबर वरून आपल्या समस्या सांगता येणार आहेत. त्यामुळे आता शहरातील कुठल्याही समस्या एका फोन नंबर वरून सोडवण्यात येणार असल्याने नागरिकांनी महापौर सौ अश्विनी कमलेश निकम यांचे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

या अधिकृत हेल्पलाइन नंबरा बाबत कमलेश निकम यांनी सांगितले आरोग्याची सेवा असो किंवा शहरातील रस्त्यांसंदर्भात, याशिवाय नागरिकांच्या छोट्या समस्या देखील असतील तर या टोल फ्री नंबर वरती आपल्या समस्या मांडू शकणार आहेत. आता शहरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांना आपल्या समस्यासाठी महापौर कार्यालयात जाण्याची किंवा जनसंपर्क कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्या समस्या मिळताच महापौर स्वतः समस्याच्या ठिकाणी हजर राहणार आहेत. आपल्याला महापौर यांच्या दरवाजावर जाण्याची आता गरज नाही. स्वतः महापौर तुमच्या दरवाज्यात येणार आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेचा हा महापौर शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पप्पू कलानी यांचा महापौर आहे.

हा महापौर जनतेचा आहे. त्यामुळे आता तुमच्या सगळ्या समस्याचे निवारण केले जाणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर सौ अश्विनी कमलेश निकम यांनी निवडून येताच दुसऱ्याच दिवशी के. बी. रोडची पाहणी केली व व्यापाऱ्यांच्या काही समस्या जाणून घेतल्या. इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. जनतेने मला निवडून दिले आहे. त्यामुळे उल्हासनगर नागरिकांच्या समस्या आता एका फोन नंबर वरून सोडवण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांकरिता हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. असे कमलेश निकम यांनी सांगितले .

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *