उल्हासनगर , दि . २० प्रतिनिधी : उल्हासनगर येथील ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी आज अखेर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवासेनेला जय महाराष्ट्र करत सेना सोडल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. हा उबाठाला मोठा झटका असुन उल्हासनगर शहरात ठाकरे यांची शिवसेना संपल्यात जमा झाली आहे.
उल्हासनगर येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार हे गेल्या ४६ वर्षापासुन शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गद्दारी मुळे त्यांच्यावर आपल्या लेखनीच्या माध्यमातुन जोरदार प्रहार केले असुन शिंदेवर गद्दाराना क्षमा नाही असे पुस्तक लिहुन राज्यभर खळबळ उडवुन दिली होती. तर उध्दव ठाकरे यांच्या पळत्या काळात साथ दिल्याचे दिलीप मालवणकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान ५ फेबृवारी रोजी मालवणकर यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला असुन त्या हल्ल्यात ते जायबंध झाले आहेत . त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली , मात्र या हल्ल्याबाबत शिवसेनेच्या एका ही नेत्याने साधी विचारपुस देखील केली नसल्याचा आरोप मालवणकर यांनी केला आहे. त्यामुळेच आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान यापुढे कोणत्या ही पक्षात न जाता निस्पक्ष पत्रकारिता करणार असल्याचे दिलीप मालवणकर यांनी सांगितले आहे. मालवणकर यांनी शिवसेना सोडल्यामुळे उल्हासनगर मध्ये उबाठाला मोठा झटका बसला आहे.



