उल्हासनगर

उल्हासनगर वालधुनी नदीच्या प्रदुषणात वाढ , एम आय डी सी च्या मुख्य अभियंत्याचे दुर्लक्ष

उल्हासनगर , दि . १३ प्रतिनिधी : उल्हासनगर शहरातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रदुषणात दिवसे दिवस वाढ होत चालली असुन दररोज अंबरनाथच्या एम आय डी सी मधील रासायनिक कंपन्यांचे दुषीत केमिकलचे पाणी नदीत सोडल्याने नदीतील पाणी काळे पिवळे झाले आहे.एम आय डी सी चे मुख्य कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांचे या प्रदुषणाकडे दुर्लक्ष झाले असुन ते रासायनिक कंपनीच्या प्रदुषणाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नदी सवर्धन समितीने केला आहे.

श्री मलंग गडाच्या डोंगरातुन उगम पावलेली वालधुनी नदी ही अत्यंत स्वच्छ होती. तर अंबरनाथ येथील एम आय डी सी मध्ये तयार झालेल्या रासायनिक कंपन्या यांचे दुषित सांडपाणी कोणती रासायनिक प्रक्रिया न करता नदीत सोडन्यात येते. तेव्हा पासुन सदर नदी ही प्रदुषीत झाली असुन नदीला स्वच्छ करण्यात येथील सत्ताधारी यांना यश आले नाही . दरम्यान अंबरनाथ येथील एम आय डी सी मधील रासायनिक कंपन्यांचे दुषीत सांडपाणी या नदीत येत असल्याने नदीच्या पाण्याचा रंग हा दरदिवशी बदलत चालला आहे. तर नदीच्या पात्रात काही ठिकाणी अतिक्रमण झाले असुन पात्र देखिल लहान झाले आहे. एम आय डी सी चे मुख्य कार्यकारी अभियंता संजय ननवरे हे या दुषित कंपन्याना मदत करत असल्याचा आरोप होत आहे. तर सदर कंपन्याकडे दुषित पाण्यावर प्रक्रिया करण्याचा कोणता ही प्लांट नसल्याने ह्या कंपन्या दुषित पाणी नदीत सोडत आहेत. कल्याण बदलापुर या दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकन्याचे काम सुरु असुन उल्हासनगर जवळच वालधुनी नदीच्या पात्रात रेल्वेवाले भराव करत असल्याने सर्व कचरा नदीत टाकन्यात येत आहे. तर अंबरनाथ च्या वडोलगावात उल्हासनगर महापालिकेने सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरु केला होता. सोबतच शांतीनगर येथे सुध्दा सिवेज प्लांट तयार केला असताना सर्व दुषित पाणी मात्र वालधुनी नदीतच सोडन्यात येत आहे. सिवेज प्लांट च्या नावाने करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. अंबरनाथ व उल्हासनगर येथील नवनिर्वाचित प्रतिनिधी यांनी नदी स्वच्छ करन्यासाठी योग्य नियोजन तयार करुन वालधुनी नदीला जीवंत करा अशी मागणी वालधुनी जलबिरादरी चे प्रमुख शशिकांत दायमा यांनी केली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *