उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये अंतिम सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या नावाने समाज हॉल उभारण्याची मागणी; चौहान एकता फाउंडेशनचे महापौरांना निवेदन

उल्हासनगर , दि . २० प्रतिनिधी : उल्हासनगरमध्ये मोठ्या संख्येने चौहान समाज वास्तव्यास असून समाजातील अनेक जण विविध व्यवसायांशी संबंधित आहेत. चौहान समाजाचे आराध्य असलेले अंतिम हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे मोठे अनुयायी शहरात आहेत. समाजाच्या सन्मानासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक आदी उपक्रमांसाठी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या नावाने समाज हॉल उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी चौहान एकता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर व आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
माहितीनुसार, उल्हासनगर शहरात चौहान समाज दरवर्षी सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करीत असतो. तसेच समाजाच्या वतीने कन्यादान, शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातही योगदान दिले जाते. समाजाला हॉल उपलब्ध झाल्यास सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम अधिक सुयोग्य पद्धतीने आयोजित करता येतील. हा हॉल सर्व समाजासाठीही उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
चौहान एकता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर अश्विनी निकम, शहराचे आमदार कुमार आयलानी आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांना निवेदनाची प्रत देत समाजहितासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सुरेश चौहान (राष्ट्रीय महासचिव), हरेंद्र चौहान (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष), राजाराम चौहान (राष्ट्रीय उपाध्यक्ष), वसंत चौहान (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), हनुमान चौहान (शहराध्यक्ष), लालमोहन चौहान, बहिनी चौहान यांसह संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *