उल्हासनगर

सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने उल्हासनगरात न्यूरोलॉजी आणि स्पाइनशी संबंधित मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न

उल्हासनगर , दि . २३ प्रतिनिधी : ठाण्यातील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने उल्हासनगरातील रहिवाशांसाठी काल न्यूरोलॉजी आणि स्पाइनशी संबंधित विकारांवर मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. जवळपास ७५ हून अधिक रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

या मोफत वैद्यकीय शिबिरात, सोलारिस हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. दीपक ऐवळे (न्यूरोलॉजिस्ट) आणि डॉ. अमित ऐवळे (न्यूरोसर्जन) यांनी ब्रेन आणि स्पाइन ट्यूमर, क्रॉनिक डोकेदुखी, फिट्स, व्हर्टीगो, न्यूरोपॅथी, हालचाल आणि संतुलन विकार, मायस्थेनिया ग्रॅव्हिस इत्यादींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी केली. डॉ. अमित ऐवळे न्यूरोसर्जनने रुग्णांना न्यूरोनेव्हिगेशन संगणक मार्गदर्शित मेंदू शस्त्रक्रिया, कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रियेबद्दल देखील शिक्षित केले आणि उपचार आणि काळजीबद्दल एकूण मार्गदर्शन केले. हे शिबिर अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट; इंडियन रेड क्रॉस सोसायटी, उल्हासनगर रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर सपना गार्डन, रोटरी क्लब ऑफ अर्बनिया ठाणे आणि उल्हासनगर मेडिकल असोसिएशन. यांच्या संयुक्त उपक्रमातून घेण्यात आले. या शिबिराला अनेक नामांकित संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि उल्हासनगर व्यापारी समुदायाचे सहकार्य लाभले.
या मोफत वैद्यकीय शिबिरासाठी उपमहापौर श्री. अमर लुंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मोफत वैद्यकीय शिबिरासाठी प्रमुख पाहुण्यांमध्ये नगरसेविका मीना सोंडे, नगरसेवक राम दुदानी नगरसेविका नॅन्सी एस. उदासी, नगरसेविका सुहाना जेसवानी यांच्यासह रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर सपना गार्डनचे अध्यक्ष गोरधन गोलानी , इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष नेवांद्रम करिरा ,उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी, व्हीटीव्ही प्रॉडक्शनचे अध्यक्ष दीपक वाटवानी आदी उपस्थित होते. सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉ. दीपक ऐवळे आणि डॉ. अमित ऐवळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा आणि सन्माननीय पाहुण्यांचा सत्कार केला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *