पुढच्या आठवड्यात 14/15/16 ड्राय डे
मुंबई दि. ९ प्रतिनिधी:राज्यभरात 29 महानगर पालिकांची निवडणूक होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंध नियमानुसार पुढील आठवड्यात बुधवार 14, गुरुवार 15 आणि शुक्रवार 16 तारखेला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता लागू असलेल्या मनपा…
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी सुट्टी:राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
मुंबई प्रतिनिधी:मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महापालिका क्षेत्रात त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व…
कुळगाव–बदलापूर नगरपरिषद उपनगराध्यक्ष निवडणूकीत भाजपचा व्हीप जारी, नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना
बदलापूर, दि.८,प्रतिनिधी:कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने उपनगराध्यक्ष पदासाठी आपल्या उमेदवार प्रियांका दामले यांना मतदान करण्याचे आदेश देत अधिकृत व्हीप जारी…
उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना सुरेश जाधव यांचे विरोधातील उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश उल्हासनगर , दि . ८ प्रतिनिधी : उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १३ ब च्या नगरसेविका श्रीमती ज्योत्स्ना सुरेश जाधव यांचेवर परमार चाळ,सिटी सर्वे नंबर 18607,ब्लाँक नंबर 521,अंबिका…
उल्हासनगर मध्ये गुंडाराज नाही चालणार मुख्यमंत्र्याचे आश्वासन
उल्हासनगर , दि . ८ प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आले असता त्यांनी शहरात गुंडागर्दी खपवुन घेणार नसल्याचे इशारा देत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्या यंत्रणेचे काम सुरु आहे . शहर विकासासाठी कोणता…
मुरबाडमध्ये न्याहाडीतील काळू नदीवरील पुलावर संरक्षक कठडे नसल्याने टेम्पो नदीत कोसळला
मुरबाड,दि.८,प्रतिनिधी:मुरबाड तालुक्यातील न्याहाडी गावातील काळू नदीवरील पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे. मालवाहू आयशर टेम्पो पुलावरून घसरून थेट काळू नदीत कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुरबाड तालुक्यातील न्याहाडी गावातील काळू नदीवर बांधलेल्या पुलावर संरक्षक…
व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. ८:- पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ. माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, डॉ…
ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीत फडणवीस, शिंदे टार्गेटवर
मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो : राज ठाकरे राज्यकर्त्याचे प्रेम राज्यावर असावे, सत्तेवर नाही : उद्धव ठाकरे मुंबई : सत्तेवर असणाऱ्ऱ्यांना स्वतःचे घर भरायचे आहे, त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. सध्या सुरू असलेली निवडणूक सत्ता आणि पैशाच्या जोरावर…
बदलापूर एमआयडीसीमध्ये भीषण अग्नितांडव; पॅसिफिक बायो केमिकल कंपनीला आग
बदलापूर, दि.७,प्रतिनिधी:बदलापूर एमआयडीसी खरवई औद्योगिक क्षेत्रातील आग लागल्याची घटना समोर आली आहे.सलग १० ते १२ स्फोट झाले, तर आगीच्या ज्वाला जवळपास २ किलोमीटर परिसरातून आकाशात लोंबकळताना दिसत होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,बदलापूर एमआयडीसी खरवई औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र.डब्ल्यू १११ वर असलेल्या…
मेट्रो-१ मार्गिकेच्या १२ स्थानकांवर आता सॅनिटरी पॅड देणारे यंत्र
मुंबई : प्रतिनिधी:घाटकोपर- अंधेरी- घाटकोपर या मेट्रो-१ मार्गिकतील सर्व बारा मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) खासगी कंपन्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेमुळे महिला…









