बदलापूर एमआयडीसीमध्ये भीषण अग्नितांडव; पॅसिफिक बायो केमिकल कंपनीला आग
बदलापूर, दि.७,प्रतिनिधी:बदलापूर एमआयडीसी खरवई औद्योगिक क्षेत्रातील आग लागल्याची घटना समोर आली आहे.सलग १० ते १२ स्फोट झाले, तर आगीच्या ज्वाला जवळपास २ किलोमीटर परिसरातून आकाशात लोंबकळताना दिसत होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,बदलापूर एमआयडीसी खरवई औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र.डब्ल्यू १११ वर असलेल्या…
बदलापुरात इंजिनला धक्का, घड्याळ फास्ट!मनसेच्या महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
बदलापूर, दि.६,प्रतिनिधी:एकीकडे महापालिकांची रणधुमाळी सुरु असताना बदलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून मनसेच्या महिला शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार ) अधिकृत प्रवेश केला आहे.या पक्षप्रवेशामुळे बदलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा पक्षप्रवेश सोहळा राज्यमंत्री…
बदलापुरमध्ये रात्री उशिरा कंपनीकडून विषारी वायूचा उत्सर्जन – परिसरात धूसर स्थिती!
बदलापुर,दि.६,प्रतिनिधी बदलापुर शहरात रविवारी रात्री उशिरा एक औद्योगिक कंपनीतून विषारी वायू सोडण्यात आला, ज्यामुळे परिसरात एक ते दीड किलोमीटरपर्यंत विषारी वायू पसरल्याची घटना स्थानिकांनी नोंदवली आहे. या प्रसरामुळे हवेत धूर / धूसर स्थिती जाणवली आणि श्वास घेणे काही भागात कठीण…
बदलापुर पूर्व येथील पतपेढी शाखेवर चोरीचा प्रयत्न
बदलापूर, दि.६,प्रतिनिधी:बदलापूर पूर्व येथील एका पतपेढीवर चोरी झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून चोरांनी पतपेढीमध्ये प्रवेश केला.ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,बदलापुर पूर्व येथील लक्ष्मीबाग सहकारी पतपेढी मर्यादीत, शाखा कार्यालयावर चोरीचा प्रयत्न…
बदलापूरच्या ऐतिहासिक चंदेरी गडावर गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू
बदलापूर, दि ५,प्रतिनिधी:बदलापूर जवळ ऐतिहासिक चंदेरी गडावर गिर्यारोहणासाठी आलेल्या एकाचा गडावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेनंतर सुरू असलेले शोधकार्य तब्बल २४ तासांनंतर यशस्वी झाले असून स्थानिक रेस्क्यू टीमने मृतदेह सुरक्षितपणे खाली आणला. या घटनेमुळे ट्रेकिंग समुदायात हळहळ व्यक्त होत आहे….
रेझिंग डे सप्ताहात बदलापूर पूर्व पोलिसांचा कौतुकास्पद उपक्रम; हरवलेले १९ मोबाईल नागरिकांना परत
बदलापूर, दि.३,प्रतिनिधी:ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनतर्फे रेझिंग डे सप्ताहानिमित्त चोरीस, हरवलेले मोबाईल नागरिकांना परत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वर्षभरात चोरीस गेलेले,हरवलेले मोबाईल हस्तगत करून नागरिकांना परत देण्यात आले होते. यावेळी डिसेंबर महिन्यातील उर्वरित मोबाईल नागरिकांना सुपूर्द…
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत ९ जानेवारीला उपनगराध्यक्ष,स्वीकृत नगरसेवक निवड, राजकीय हालचालींना वेग
बदलापूर, दि.४,प्रतिनिधी:कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र नामनिर्देशित सदस्य(स्वीकृत नगरसेवक) आणि उपनगराध्यक्ष पदाकरिता चढाओढ पाहायला मिळणार आहे.येत्या पाच दिवसात ही निवड प्रक्रिया पूर्ण होईल. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत येत्या ९ जानेवारी रोजी पाच स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाची…






