संजय राऊत हक्कभंगप्रकरणी सभागृहात राडा, विधिमंडळाची दोन्ही सभागृहे स्थगित

मुंबई, दि.०१। प्रतिनिधी मुंबई संजय राऊतांनी विधिमंडळ सदस्यांना चोरमंडळ संबोधल्याने विधान सभा आणि विधान परिषदेत आज तुफान गोंधळ झाला. कामकाज सुरू होताच विधान सभेत आशिष शेलार आणि अतुळ भातखळकर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधान परिषदेतही यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी हक्कभंग समितीकडून केली जाईल. त्यानंतर, ८ मार्चला याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.आज सकाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहाला उज्ज्ावल परंपरा आहे असं सांगत संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर हक्कभंग आणावा असा प्रस्ताव आणण्यात आला. याला महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही मुकसंमती होती. सभागृहाचा आणि विधिमंडळ सदस्यांचा अपमान झाला असेल तर परंपरेनुसार संबंधितांवर कारवाई व्हावी अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रत्येकाची मते ऐकून घेत असताना सभागृहात तुफान गोंधळ झाला. त्यामुळे अधिवेशन सुरू झाल्यानंतर दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर सभागृहात संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी सुरू झाल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह स्थगित करत असल्याची घोषणा केली. त्याआधी त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात हक्कभंग समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची पुढील दोन दिवसांत हक्कभंग समितीकडून चौकशी केली जाईल. या चौकशीतून समोर आलेल्या अहवालानुसार ८ मार्च रोजी निर्णय सुनावला जाईल, असं राहुल नार्वे कर यांनी सभागृहात स्पष्ट केले. संजय राऊतांविरोधात आक्रमक भूमिका घेताना सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्याविरोधात सभागृहात घोषणाबाजी झाली.

संजय राऊत हाय हाय करत सत्ताधाऱ्यांनी सभागृग दणाणून सोडला.गुलाबराव पाटील विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारा ही कोणती औलाद आहे? सभागृहाची गनिमा आहे. लोकांच्या मतावर येथे आलो आहे. यांच्यासारखे मागच्या दरवाजाने आलो नाही. यांनी शिवेसनेची वाट लावली. उरलेल्या १६ चीही वाट लावतील. उद्धव ठाकरेंनाही उल्लू बनवलं. ३५- वर्षे काम करणाऱ्यांची वाट लावली. शिवेसनेची वाट लावण्याऱ्यानेया सभागृहाचा अपमान केला आहे. चार लाख लोकांतून निवडून येतो, त्यामुळे आम्ही चोर नाही. या चोराने आमची मते घेतली आहे. गनिमा राखायची असेल तर आज त्यांनी खासदारपदाचा राजीनामा द्यावा.भास्कर जाधव या सभागृहाच्या प्रतिष्ठेबद्दल, सन्मानाबद्दल अपमान होत असेल तर परंपरेनुसार काही निर्णय झाले तर मान्य केले पाहिजेत. सभागृहात हा विषय आला तेव्हा मी येथे नव्हतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *