नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा

मुंबई, दि.१७। प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप पुकारला आहे. तसेच हा संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. असे असतानाच आता राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन पेन्शन योजनेत कुटुंब निवृत्ती वेतनाबाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संप पुकारलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नवीन पेन्शन योजनेत कुटुंब निवृत्ती वेतन नेमकं किती मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये झाला आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू योगदान देण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे.कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *