लंडनमधील भारतीय दूतावासात फडकवला तिरंगा

बांगलादेश, दि.२०। वृत्तसंस्था ब्रिटनमधील भारतीय दूतावासाने खलिस्तानी समर्थकांना चांगलीच चपराक बसवली आहे. लंडनमधील भारतीय दूतावासाने उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर मोठा तिरंगा फडकावला आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकावलेला तिरंगा रविवारी फुटीरतावादी खलिस्तानी समर्थकांनी खाली उतरवला होता. याला चोख प्रत्युत्तर देत उच्चायुक्तालयावर आता दूतावासाने आधीच्या झेंड्यांच्या आकारापेक्षाही मोठ्या आकाराचा झेंडा फडकावला आहे. रविवारी खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी करत भारतीय दूतावासाच्या इमारतीवर हल्ला करत राष्ट्रध्वज खाली उतरवला होता. या घटनेनंतर भारतात संतापाची लाट पसरली होती. आता भारतीय दूतावासाने खलिस्तानींना चांगलीच चपराक दिली आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर रविवारी खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला.

दूतावासाच्या इमारतीवर हल्ला करत तेथे तोडफोड केली. इतकंच नाही तर खलिस्तान समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचाही अपमान केला. उच्चायुक्त कार्यालयावरील भारताचा राष्ट्रध्वज खाली उतरवत त्यांनी तिथे खलिस्तानी झेंडे फडकवले. या घटनेचा भारतात निषेध व्यक्त करून कारवाईची मागणी करण्यात आली होती. आता पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा फडकावून खलिस्तानींना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. याआधी रविवारी अनेक व्हिडीओ समोर आले होते. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांलयावरील तिरंगा हटवण्यात आल्याचं या व्हिडीओंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तिरंग्याच्या जागी खलिस्तानी ध्वज लावण्यात आला होता. भारतात खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केलं. त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *