उल्हासनगर महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना युतीच्या नगरसेवकांनी खासदारांच्या निवासस्थानी केला विजयोत्सव साजरा
उल्हासनगर , दि . १८ प्रतिनिधी : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला असुन निवडणुकीत शिवसेना – टीम ओमी कलानी आणि साई पक्ष युतीच्या ३६ उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवला आहे . या निवडणुकीत नागरिकांनी मतरूपी दिलेला आशीर्वाद आणि भक्कम पाठिंबा यामुळे शिवसेनेला हे घवघवीत यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया विजय उमेदवारांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत विजय झालेल्या शिवसेना – टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी ठाणे येथील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. याशिवाय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पेढे भरवत सत्कार करून त्यांच्या समवेत विजयोत्सव साजरा केला.
सर्व विजयी नगरसेवकांनी एकमेकांना पेढे भरवत अभिनंदन केले. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व विजयी नगरसेवकांना सांगितले की जनतेने दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आपण सर्व निवडून आले असून जनतेसाठी अविरतपणे कार्य करा असे आव्हान सर्वांना केले. त्यावेळी उल्हासनगरातील शिवसेना युतीचे सर्व विजयी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




