वर्धा, १८प्रतिनिधी. भारतातील आघाडीची स्टील उत्पादक कंपनी एव्होनिथ स्टीलने शहरात आंबेडकर चौक येथे ‘द १०के रन फॉर एन्व्हायर्नमेंट’चे आयोजन केले. पर्यावरण संरक्षण आणि चांगल्या सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा हा उपक्रम होता. अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळावा यासाठी ही मॅरेथॉन १० किमी आणि ५ किमी अशा दोन अंतरात घेण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरही शर्यत पार पडली असून तीन वेगवेगळ्या वयोगटांसाठी स्वतंत्र स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. या मॅरेथॉनमध्ये १६ वर्षांवरील ३हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
मुख्य पाहुणे आणि अन्य मान्यवरांची माहिती निश्चित झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येईल. एव्होनिथस्टीलच्या सर्व सहभागी धावपटूंनी तसेच प्रमुख व्यवस्थापन कर्मचार्यांनी सेल्फी बूथवर ‘हिरव्या भविष्यासाठीची शपथ घेऊन आपली बांधिलकी व्यक्त केली. ही शपथ सोशल मीडियावर शेअर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यात आला. १० किमी आणि ५ कि.मी. या दोन्ही शर्यतींसाठी तीन वेगवेगळ्या वयोगटांमध्ये रोख बक्षिसे आणि पदके देण्यात आली. तसेच, सर्व नोंदणीकृत सहभागी धावपटूंना सहभागाबद्दल गुणवत्तापत्र प्रदान करण्यात आले.
या उपक्रमांच्या माध्यमातून ३० गावांमधील ग्रामीण भागातील ५०हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणला जात आहे.पर्यावरणाचे संरक्षणही सर्व भागधारकांची सामूहिक जबाबदारी आहे, असा कंपनीचा ठाम विश्वास असून, ही मॅरेथॉन त्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे एव्होनिथ स्टीलने स्पष्ट केले आहे.




