रस्ता मोकळा करण्याच्या प्रकरणात गटविकास अधिकाऱ्यांनी फिरवला चौकशी अहवाल
कारंजा:तालुक्यातील बोटोना ग्रामपंचायत मध्ये सार्वजनिक रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी अर्जदाराने केलेल्या तक्रारीवर ग्रामपंचायत अधिकारी राहुल खेरडे यांनी चक्क सदर रस्ता हा खाजगी असल्याचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करून गावात अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अर्जदार रामकृष्ण सकर्डे यांनी केला असून यासंबंधी आमदार सुमित वानखडे यांना निवेदन सादर केल्यानंतरही अर्जदाराला न्याय न मिळाल्याने आता ग्रामपंचायत समोर उपोषण करण्याचा ठाम निर्धार करत या प्रकरणाची विशेष अधिकाऱ्याकडून पुन्हा चौकशी करण्याची मागणी अर्जदार रामकृष्ण सकर्डे यांनी केली आहे.
याप्रकरणी अर्जदार रामकृष्ण सकर्डे यांनी बोटोना ग्रामपंचायत हद्दीतील त्यांचे घराचे समोरील वहिवाटीचा असणारा जुना रस्ता हा गैर अर्जदार वसंता सकर्डे,रघुनाथ सकर्डे,धनराज सकर्डे यांनी टीन लावून अडविला असून सदर रस्त्याबाबत मंडळ अधिकारी सारवाडी यांनी मात्र हा रस्ता सार्वजनिक असल्याचे नमूद केल्यानंतरही चौकशी अहवालात गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकारी राहुल खेरडे यांना हाताशी घेऊन राजकीय दबावापोटी हा रस्ता सार्वजनिक नसल्याचे दाखवून अर्जदारावर अन्याय केल्याची भावना ग्रामस्थांमध्ये पसरली आहे.
ग्रामपंचायत अधिकारी राहुल खेरडे यांनी केली तहसीलदारांच्या आदेशाची अवहेलना
अर्जदाराचा रस्ता मोकळा करून देण्याबाबत तहसीलदार यांनी ग्रामपंचायत अधिकारी राहुल खेरडे यांना दिनांक 12 नोव्हेंबर 2025 ला पत्र तामील केले होते परंतु सदर पत्रावर मुजोर ग्रामपंचायत अधिकारी खेरडे यांनी कोणतीही कार्यवाही न करता गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांचे हात ओले करून कोणत्याही प्रकारची कार्यवाही पूर्ण केली नाही त्यामुळे उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ यांनी तातडीने 19 डिसेंबर 2025 ला गटविकास अधिकाऱ्यांच्या नावे पत्र जारी केले.सदर पत्रानुसार गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी ग्रामपंचायत अधिकारी राहुल खेरडे यांना पत्र तामील करून अहवाल मागितला त्यानंतर गैर अर्जदारांना सोयीचा होईल असा चौकशी अहवाल तयार करून प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न गटविकास अधिकाऱ्यांनी केला असल्याचा गंभीर आरोप अर्जदार रामकृष्ण सकर्डे यांनी केला आहे…..
सदर रस्ता हा खाजगी असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकारी राहूल खेरडे यांनी दिले असुन सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. सदर प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून कागदपत्रे प्राप्त झाल्यास अधिकची चौकशी करता येईल………..
कैलास वानखडे विस्तार अधिकारी पंचायत प्रतिक्रिया 2) ग्रामपंचायत बोटोना हद्दीत येणारा रस्ता हा शंभर टक्के खाजगी असून सकर्डे कुटुंबाचा अंतर्गत वाद आहे याप्रकरणी चौकशी अहवाल तयार झालेला असून तो वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आलेला आहे त्यानुसार समोरील कार्यवाही पार पडेल. याप्रकरणी मी अधिक काहीही सांगू शकत नाही
राहुल खेरडे ग्रामपंचायत अधिकारी





