नवी दिल्ली | 15 जानेवारी २०२६:दिल्ली येथे आयोजित AICOG (All India Congress of Obstetrics and Gynaecology) या राष्ट्रीय अधिवेशनात सेवाग्राम ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनॅकोलॉजी सोसायटी (Sewagram OBGY Society) ला वर्ष २०२४–२०२५ साठीचा FOGSI (FEDERATION OF OBSTETRICS AND GYNAECOLOGY SOCIETY OF INDIA )अध्यक्षांचा फिरता चषक प्रदान करण्यात आला.
सध्या भारतात एकूण ४२५ स्त्रीरोगतज्ज्ञ सोसायटी कार्यरत असून, त्यापैकी कॅटेगरी ‘C’ मध्ये ८७ सोसायटींची नामांकने प्राप्त झाली होती. या कठीण व स्पर्धात्मक प्रक्रियेतून सिवाग्राम OBGY सोसायटीची निवड होऊन हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाल्याने वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाचा गौरव वाढला आहे.
हा पुरस्कार सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. पुनम वर्मा व सचिव डॉ. शिल्पा राऊत यांच्या सक्षम व दूरदर्शी नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आला. मातृ आरोग्य, महिलांचे सर्वांगीण आरोग्य, सुरक्षित मातृत्व, जनजागृती उपक्रम, सामाजिक आरोग्य सेवा तसेच डॉक्टरांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात सोसायटीने सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य केले आहे.
ग्रामीण व शहरी भागातील महिलांपर्यंत दर्जेदार स्त्रीरोग सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने सेवाग्राम OBGY सोसायटीने राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत FOGSI तर्फे हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दिल्ली येथे आयोजित ALL INDIA gynae CONFERENCE मध्ये सचिव डॉ शिल्पा राऊत आणि HOD डॉ शुची जैन ह्यांना प्रदान करण्यात आला.
या यशामुळे भविष्यातही महिलांच्या आरोग्यासाठी अधिक प्रभावी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.





