वर्धा

शहराच्या विकासाकरिता पक्षभेद विसरुन काम‌ करा- आम. कुणावार

नगराध्यक्ष राणी कलोडे यांच्यासह सर्वांचे पदग्रहण

सिंदीरेल्वे— नवीन चमुच्या सर्व सदस्यांनी कोणतेही मतभेद न बाळगता शहराच्या विकासार्थ एकजूट दाखवावी. एकमतांनी घेतलेल्या निर्णयामुळे नगरीचा सर्वांगीण विकास होईल, त्यासाठी सर्वांना अनंत शुभेच्छा, असे आशीर्वचन आम. समीर कुणावार यांनी दिले. ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष‌ आणि वीस नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्यात बोलत होते.

आज सकाळी ९-३० वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. राणी कलोडे तथा हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डाॅ. नयना तुळसकर आणि आम. कुणावार समर्थकांसह नगर परिषदेच्या सभागृहात वाजतगाजत पोहचले. तेथे आम. समीर कुणावार आणि दीड हजार नागरिकांच्या हजेरीत मुख्याधिकारी प्रणोती गावित यांनी राणी कलोडे यांना पदभार सोपविला.
पालिकेचा पदभार सांभाळताच निवडणुकीत यशस्वी झालेल्या भाजपाच्या दहा, एक अपक्ष धरुन अकरा आणि कांग्रेस व शरद पवार गटांचे नऊ नगरसेवकांचे पुष्पहार अर्पण करुन स्वागत करण्यात आले.

आमदार समीर कुणावार यांनी आपल्या भाषणात ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि आरोग्यमंत्री यांची भेट घेणार आहे. तसेच पाणी पुरवठा यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी भक्कम निधी मिळेल याची खात्री बाळगा, असे अभिवचन दिले.
यावेळी मंचकावर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नव निर्वाचित नगरसेवक/सेविका तथा सहयोगी पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळ्याचे संचालन भगवंत पवार यांनी केले तर सर्वांचे आभार सौ. राणीताई कलोडे यांनी मानले.
फोटो आहे

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *