खरी खरी संपादकीय

ऊर्जावान सदानंद दाते

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते यांना नेमण्यात आलेले आहे. आतापर्यंत ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख होते, ते पद कदाचित या पदापेक्षाही मोठे आहे आणि असेलही परंतु, आपल्या मायभूमीत आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांच्यासारख्या पोलीस खात्यातील अकलंक अधिकाऱ्याला या पदावर नेमणे नेमण्याचे हे कार्य महाराष्ट्राचे गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री यांनी केलेले आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जे एफ रिबेरो रोड्रिक्स, अरविंद ईनामदार यांच्यासारख्याच अनेक महनीय अधिकाऱ्यांचा ठसा उमटवलेल्या जागेवर दातेसाहेबांची नियुक्ती महाराष्ट्रासाठी अत्यावश्यक होती. यापूर्वीच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द जशी होती तशी होती पण, आता आलेल्या दाते | साहेबांना त्यांना नोकरी लागल्याबरोबर त्यांची पंधरवड्यातच बदली झाली. | त्यावेळी झालेली बदली त्यांच्या स्वच्छ कारभाराची ग्वाही होती हे मान्य केलेच पाहिजे.

आपल्या पोलीस खात्याची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी ज्या ज्या उच्च अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले तसेच प्रयत्न आणि मिळालेल्या उच्च पदाला साजेशी कृती आणि कार्य करण्यासाठी दाते साहेब प्रयत्न करतीलच. या अधिकाऱ्याला सत्यापासून विचलित करणारा, कर्तव्यापासून परावृत्त करणारा, आणि कुणाच्यातरी दबावाखाली येऊन वाटेल तसे निर्णय घेणारा अधिकारी म्हणून कधीच ओळखले गेले नाही. चिपळूण | मधील पहिल्या नियुक्तीनंतर अवघ्या आठ ते दहा दिवसात बदली होणे, हा त्यांच्या सद्विचारांचा विजय आहे असेच दिसले होते. कोळशाच्या खाणीत राहूनही कुठेही काळा डाग लागू न देता त्यांनी जी जी पदे स्वीकारली, त्या त्या पदांचे सोने केले. आज कालच्या काळात राजकारणी महानुभवांच्या अपेक्षा पूर्ण करता करता अनेक निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात.

मात्र, सदानंद दाते यांची ख्याती अशी आहे की जे कायद्यात बसेल, सद्सद्विवेक बुद्धीला पटेल आणि जे जनहितार्थ असेल तेच दाते यांनी केलेले आहे. सदानंद दाते हे पोलीस अधिकाऱ्यांच्या नभांगणातील तारा आहेत, असे | सर्टिफिकेट मा. पोलीस आयुक्त जे. एफ. म्हणजेच ज्यूलियो रिबेरो यांनीच त्यांना दिले होते. रिबेरो यांच्या सारख्या अधिकाऱ्याने एखाद्याला प्रशस्तीपत्र देणे ही गोष्ट फार मोठी आहे. रिबेरो यांच्याकडून अशा प्रकारे उल्लेख होणे म्हणजेच, तो माणूस कोळशाच्या खाणीतून निघालेला हिराच आहे. हे सर्वांनी समजून घ्यावेच लागेल कारण, त्यांच्या सेवाकाळात जे जे काम दिले गेले ते ते त्यांनी उत्तम पार पाडलेले आहे.

कर्तव्य दक्षतेच्या भावनेतून सर्व काम करणाऱ्या या अधिकाऱ्याला आता मुंबईत आपल्या कामाची चुणूक दाखवावी लागेल. स्कॉटलंड यार्ड या इंग्लंडमधील पोलीस यंत्रणे सोबत मुंबईच्या पोलीस दलाची तुलना पूर्वी होत असे. आता तो वचक, तो दरारा आणि तीच ख्याती मुंबई पोलिसांना पुनश्च मिळवून देण्याचे कार्य सदानंद दाते करतील यामध्ये शंका नाही. परंतु राज्यातील पोलीस यंत्रणेचा मुखडा | सचोटीचा आणि प्रामाणिकपणाचा आहे हे जोपर्यंत जनतेला दिसत नाही. तोपर्यंत या खात्यावरचा विश्वास उंचावण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते ते सदानंद दाते करतील याची खात्री वाटते. दाते यांनी ‘न्यायदाते’ व्हावे हीच आमची अपेक्षा आहे आणि अर्थात तीच त्यांची परीक्षा आहे. त्यामध्ये ते उत्तीर्ण होतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ज्या अधिकाऱ्याबद्दल आदर आणि विश्वास आहे. असा सर्वकालीन तिमत्ता बाळगून कारभार करणारा अधिकारी संचालक पदी लाभल्यामुळे पोलीस खात्यातील बऱ्याचशा सचोटीच्या आणि नेकीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस दलाची मान उंचावण्यासाठी कार्य करण्याची ऊर्जा |लाभेल, हेच महत्त्वाचे!

श्रीकृष्ण चांडक
nagpurpost@gmail.com
mahasagarngp@gmail.com Mob. No.9922970023

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *