नागपूर

पाणीटंचाई होऊ देणार नाही

महासागर प्रतिनिधी नागपूर, दि. ५ : सावनेर-कळमेश्वर तालुक्यातील सर्व गावांना नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, तसेच येणाऱ्या उन्हाळ्यात कोणत्याही गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, असे स्पष्ट निर्देश आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी दिले.

दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर तालुक्याची आढावा बैठक सावनेर पंचायत समिती येथे तसेच कळमेश्वर तालुक्याची आढावा बैठक कळमेश्वर पंचायत समिती येथे संपन्न झाली.

या बैठकीत सावनेर व कळमेश्वर या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची आवश्यकता आहे, त्या गावांकडून माहिती घेण्यात आली. हँडपंप, विहीर, नळयोजना आदी विविध मागण्यांची सविस्तर नोंद करण्यात आली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *