टॉप स्टोरी नागपूर

ढिसाळ कारभारामुळे कमी मतदान

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागपूर महापालिका निवडणुकीत यंदा कमी मतदान झाले. ऐनवेळी मतदान केंद्र बदलल्याने मतदारांना मतदान केंद्र शाेधण्यासाठी भटकंती करावी लागली. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाल्याने शहरात कमी मतदान झाल्याचे पहायला मिळाले.

गुरूवारी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. मात्र, मतदारांमध्ये पाहिजे तसा उत्साह दिसून येत नव्हता. सकाळपासूच संथगतीने मतदान सुरू हाेते. मतदानाला सुरूवात झाल्यानंतर काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्या हाेत्या.

बंद मशीन दुरूस्त करताना अर्धा ते एक तास लागला. त्यामुळे उशीराने मतदानाला सुरूवात झाली. मतदानाला उशीराने सुरूवात झाल्याने मतदानाची वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली हाेती. काही मतदार मतदानासाठी आले असता त्यांची नावे मतदारयादीत नव्हती. त्यामुळे त्यांना इकडून तिकडे धावपळ करावी लागली. तरीही त्यांचे नाव कुठेही सापडले नाही.

मतदान केंद्र शाेधताना मतदारांची दमछाक झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. प्रभाग 2 (नारी) येथील काही मतदारांनी सांगितले की, मनपा प्रशासनाने जारी केलेल्या अ‍ॅपवर परवापर्यंत आमची नावे मतदारयादीत हाेती. मतदान केंद्र देखील मिळाले हाेते. त्यानंतर एकाच दिवसात दुसèया मतदान केंद्रावर त्यांची नावे असल्याचे त्यांना समजले.
कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या केंद्रांवर
एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचे वेगवेगळ्या मतदान केंद्रात नावे हाेती. या लाेकांनी लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकाच मतदान केंद्रावर मतदान केले हाेते. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर पहायला मिळाली. संपूर्ण शहरात हा प्रकार पहायला मिळाला.

मनपा प्रशासनाने गल्लीबाेळात मतदान केंद्र तयार केले हाेते. नवीन मतदान केंद्र शाेधताना मतदारांची तारांबळ उडाली. दुपारी बारा वाजेपर्यंत कुठल्याही मतदान केंद्रावर ारशी गर्दी दिसून येत नव्हती. त्यामुळे मतदारांना सहजपणे मतदान करता येत हाेते. दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ 16 टक्के मतदान झाले हाेते.
मुस्लिमबहुल भागात गर्दी
मुस्लिमबहुल अशा माेमीनपुरा, आसीनगर, हसनबाग, ताजबाग, छाेटा ताजबाग, अंसारनगर, टेका, कामगारनगर या परिसरात सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली हाेती. मुस्लिमबहुल परिसरात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. त्यात महिलांचा देखील प्रामुख्याने सहभाग हाेता. या परिसरातील प्रत्येक केंद्रांवर मुस्लिम बांधव आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले. दुपारपर्यंत ही गर्दी पहायला मिळाली हाेती.
पैशाचा महापूर
यंदा कधी नव्हे, ताे पैशाचा महापूर पहायला मिळाला. मतदान सुरू झाले, तरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाचे वाटप सुरू हाेते. प्रभाग 8 मध्ये मतदान केंद्राजवळच काही कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत हाेते. विराेधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली हाेती.

काही लाेकांनी मतदान केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाेलिसांनी पैसे वाटणाèयांना तेथून हाकलून लावल्याने तणाव निवळला आणि पुन्हा मतदानाला सुरूवात झाली. प्रभाग 2 मध्ये सुद्धा अशीच स्थिती पहायला मिळाली. मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले. शहरातील बहुतांश झाेपडपट्टयांमध्ये हे चित्र दिसून आले.
दुपारनंतर गर्दी
दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आल्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ हाेती. परंतु, अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असल्याने साडेपाच वाजेनंतर मतदार केंद्राचे मुख्य गेट बंद करण्यात आले हाेते. आतमध्ये जेवढे मतदार हाेते त्यांना मतदान करू दिले. त्यामुळे सायंकाळपर्यंत अनेक केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत हाेत्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *