वर्धा

चक्रवर्ती राजा भोज यांच्या शोभायात्रेने कारंजा नगरी दुमदुमली

‌भोयर पवार समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

कारंजा / प्रतिनिधी धिरज कसारे

शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चक्रवर्ती राजा भोज शोभायात्रेत भोयर पवार समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शहरात मुख्य मार्गाने ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. तालुक्यातील बहुसंख्येने असलेल्या भोयर, पवार समाजाची ही राजधानी म्हणून ओळखली जाते. पवार समाजाचे वंश चक्रवर्ती राजा भोज असून त्यांच्या जयंती दरवर्षी वसंत पंचमीला साजरी करण्यात येते. यावर्षी राजा भोज जयंती २३ जानेवारीला करण्यात आली. चक्रवर्ती राजा भोज जयंती महोत्सव २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. हेमंतजी ढोले (अध्यक्ष) भोयर पवार विद्यार्थी मंडळ कारंजा (घा.), सदर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मा.श्री. डॉ. धर्मेंद्रकुमार तुरकर (प्राचार्य, प्रशासकीय सेवा पदवी महाविद्यालय नागपूर ), मा.प्रा.श्री.श्रीरामजी ढोबाळे (हे.नि.प्राध्यापक तथा वं.रा.संत तुकडोजी महाराज साहित्य प्रचारक ) उपस्थित होते व स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. नामदेवराव राऊत ( अध्यक्ष अखिल भारतीय भोयर पवार महासंघ नागपूर ) , श्रीरामजी देशमुख ( से.नि. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अमरावती ), केशवराव गोयटे ( से.नि. अभियंता लंडन ) ,श्रावणजी फरकाडे ( अध्यक्ष युवा भोयर पवार मंच नागपूर) , ॲड. प्रकाशजी धारपुरे ( अध्यक्ष कारंजा तालुका वकील संघ ) , मोहनराव पठाडे ( कार्याध्यक्ष अखिल भारतीय भोयर पवार महासंघ नागपूर ) , किशोरजी चोपडे ( अध्यक्ष युवक आघाडी नागपूर) होते व यांचे स्वागत करण्यात आले
जयंती महोत्सवासाठी प्रमुख उपस्थिती भगवान बुवाडे ( उपाध्यक्ष नगरपंचायत कारंजा), , राजेंद्र खवशी ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी कारंजा ), सौ. इंदिराताई शंकरराव कालभूत (अध्यक्षा भोयर पवार महिला मंडळ कारंजा ) उपस्थित होते . स्वागत समितीचे अध्यक्ष हेमंत तेजराव बन्नगरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले . राजा भोज जयंती महोत्सवास सर्व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. व समाजातील आपले आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नाव लौकीक करणारे समाज बांधव यांचा सत्कार करण्यात आला.

शहरात मुख्य मार्गाने ढोलताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तालुक्यातील गावातील भजन मंडळ लेझीम पथक , डीजे नृत्य ठेवण्यात आले होते तसेच ठिकाणी लंगर लावण्यात आले होते. तसेच चक्रवर्ती राजा भोज यांची विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारण्यात आली होती यावेळी तालुक्यातील सर्व भोयर पवार बांधवांनी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहुन जल्लोष साजरा केला या कार्यक्रमाचे आयोजक भोयर पवार विद्यार्थी मंडळ व राजा भोज महोत्सव समिती यांच्या कडून करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविक चक्रवर्ती राजा भोज महोत्सव समितीचे अध्यक्ष हेमंत तेजराव बन्नगरे यांनी केले डॉ . धर्मेंद्रकुमार तुरकर ( प्राचार्य प्रशासकीय सेवा पदवी महाविद्यालय नागपूर) , प्रा. श्रीरामजी ढोबाळे ( से.नि. प्राध्यापक तथा वं. राष्ट्रसंंत तुकडोजी महाराज साहित्य प्रचारक ) नामदेवराव राऊत , श्रीरामजी देशमुख, केशवराव गोयटे, यांनी समाजबांधवांनी संवाद केला व प्रा.हेमंत ढोले ( अध्यक्ष भोयर पवार विद्यार्थी मंडळ कारंजा ) यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या .

यावेळी संचालन सारंग बन्नगरे सर यांनी केले व आभार हेमंत बन्नगरे यांनी मानले. चक्रवर्ती राजा भोज इतिहास चक्रवर्ती राजा भोज पवार समाजाचे नवे वंश राजा होते. मालवा राजधानी धारानगरी ८वी ते १४ वी शताब्दीमध्ये त्यांनी ई. स. १००० ते १०५५ पर्यंत राज्य केले. राजा भोज यांनी अनेक भागात मंदिर निर्माण केले. सरस्वती मातेचे भक्त होते. त्यांनी ८४ ग्रंथ लिहले आहे. पाच हजार युद्ध लढले असून त्यातून २२ युद्धपराभूत झाले आहे. वाघ देवीचा उपासक विद्वान राजा भोज यांनी धार नगरीत पाठशाळा व उघडण्यात आली होती. यावेळी सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *