14 डिसेंबर 2025 ला कार्यकारी अध्यक्ष बनवलेले नितीन नबिन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. बिहार मधील बांकीपूर मतदार संघाचे आमदार असलेले नितीन नबिन यांना नवीन जबाबदारीच्या कुठल्या पगार मिळणार नाही पण ते ज्या पक्षाचे धोरण सांभाळणार आहेत तो पक्ष कमाई कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि सदस्यांच्या बाबतीत काँग्रेस पासून मैलो दूर आहे.
भाजपाकडून 16 जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता, त्यानुसार आज अर्ज नामांकनप्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी त्यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. या निवडीसाठी भाजपचे जवळपास सर्व मुख्यमंत्री, राज्य युनिट प्रमुख आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते.
भाजपने 14 डिसेंबर 2025 रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. आता, तेच राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहे
भाजपा संगठन पर्व अनुसार भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसाठी अर्ज आणि निवडणूक प्रक्रिया संवैधानिक आणि पारदर्शी पद्धतीने पूर्ण झालीय. 36 पैकी 30 राज्यात झालेल्या संघटनात्मक निवडणुकीनंतर अर्ज आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. देशभरातून आलेल्या विश्वास आणि समर्थनाच्या जोरावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नबीन यांची निवड झाल्याचं के. लक्ष्मण यांनी जाहीर केलं.




