जानेवारीपासून शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे. यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका महापौर पदावर शिवसेनेचा नगरसेवक असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेच्या दाव्याचे संकेत दिले आहे.
पण यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की मुंबई महानगरपालिका भाजपा आणि शिवसेनेने एकत्रित लढली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर युतीचा महापौर होईल. शिंदे शिवसेना जनादेशाच्या विरोधात जाणार नाही.
227 जागांसाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. यामध्ये भाजपाचे 89 तर शिंदे शिवसेनेचे 29 उमेदवार निवडून आले. 114 हा बहुमताचा आकडा असल्याने भाजपाला शिंदे शिवसेने कडून 25 उमेदवारांचा पाठिंबा लागणार आहे.




