शताब्दी वर्षात सेवाभावाचा शिवसंकल्प! राजावाडी रुग्णालयात नवजात अर्भक व मातांसाठी साहित्य-फळवाटप, बाळासाहेबांच्या विचारांना मानवी स्पर्श
मुंबई | प्रतिनिधी:वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची शृंखला सुरू ठेवत, राजावाडी बृहन्मुंबई रुग्णालय येथे नवजात अर्भकांसाठी वापराचे आवश्यक साहित्य तसेच त्यांच्या मातांसाठी फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम समर्थ प्राणप्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिराळा विधानसभा संपर्कप्रमुख विलास लिगाडे यांच्या वतीने राबविण्यात आला.
या कार्यक्रमात विधानसभा समन्वयक रविंद्र कोठावदे, विधानसभा संघटक अशोक वंडेकर, ईशान्य मुंबई कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, विधानसभा निरीक्षक भूषण चव्हाण, माजी उपविभाग प्रमुख चंद्रपाल चंदेलिया, संजय सावंत, शाखाप्रमुख जितेंद्र परब यांच्यासह शिवसैनिक गणेश परब, आकेश कदम, अजय चंदेलिया, सुनील वाळवंटे, खापरे, चंद्रकांतकर हळदणकर व अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान नवजात अर्भकांच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करून स्वच्छ व उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले, तर मातांसाठी पोषणमूल्य असलेली फळे देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या सेवाभावी, सर्वसामान्यांच्या कल्याणाला अग्रक्रम देणाऱ्या विचारांची आठवण करून देत, शताब्दी वर्षात असे लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
“बाळासाहेबांचे विचार हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, मानवी संवेदना आणि समाजकल्याणाचा मार्ग दाखवणारे आहेत. नवजीवनाच्या आरंभाला मदतीचा हात देणं हीच त्यांना खरी आदरांजली,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
रुग्णालय प्रशासनानेही या उपक्रमाचे स्वागत करून समाजसेवेच्या अशा प्रयत्नांमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळतो, अशी भावना व्यक्त केली. शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.




