नागपूर

७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, सीताबर्डी नागपूर

राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, सीताबर्डी नागपूर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे प्रभाग १३ भाजपाचे नगरसेवक माननीय श्री.योगेशजी पाचपोर तसेच वाचनालयाचे अध्यक्ष माननीय श्रीमती ॠतुजा गडकरी मॅडम यांच्या हस्ते सकाळी ९.०० वा वाचनालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष श्रीमती ॠतुजा गडकरी मॅडम यांनी श्री.योगेशजी पाचपोर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत घेण्यात आले. तद् नंतर अध्यक्षीय भाषण तसेच प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले.

यावेळी योगेशजी पाचपोर यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वाचनालयाचे नूतनीकरण झाल्यानंतर स्पर्धापरीक्षेकरीता मार्गदर्शन, विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रम घेण्यात यावे असे त्यांनी सुचविले. श्रीमती ॠतुजा गडकरी मॅडम यांनी आपल्या भाषणात ‘लोकशाहीचा हा सोहळा साजरा करण्यासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत, लोकशाहीचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर असून ही जबाबदारी प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून योग्य रित्या पार पाडायला हवी’ असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. यावेळी वाचनालयाच्या सहाय्यक ग्रंथपाल सौ.अश्विनी आकिनवार यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

यावेळी कार्यकारिणीचे सदस्य श्रीमती शुभा साठे, श्रीमती शारदा त्रिवेदी, श्री.मयुरेश गोखले याबरोबरच श्री.शशांक साठे, वाचनालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री.सुयोग कोळणकर, ग्रंथपाल श्री.गणेश बोरीकर, सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती अश्विनी आकिनवार, लेखापाल श्री.कैलास ठाकूर, लिपिक श्री.अक्षय मोहरील,पर्यवेक्षिका मिनाक्षी मलकानी तसेच वाचनालयाचे कर्मचारीवृंद आणि व्यावसायिक वर्ग उपस्थित होते. चहापान व अल्पाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *