टॉप स्टोरी महाराष्ट्र

अजितदादा हे केवळ माझे नेते नव्हते, तर ते माझ्या कुटुंबाचे आधारवड होते – नवाब मलिक

मुंबई दि. २८ जानेवारी – अजितदादा हे केवळ माझे नेते नव्हते, तर ते माझ्या कुटुंबाचे आधारवड होते. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि संघर्षाच्या काळात, दादा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ढाल बनून खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दिलेली ती साथ मी कधीही विसरू शकणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार जी यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद वृत्ताने मन अत्यंत व्यथित झाले आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दादांच्या निधनाने केवळ माझेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. एक कर्तव्यदक्ष आणि शब्दाला पक्का असणारा लोकनेता आपण गमावला आहे. दादा, तुमच्या आठवणी आणि तुमचे मार्गदर्शन सदैव माझ्या स्मरणात राहील असे सांगतानाच नवाब मलिक यांनी आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *