बदलापूर

बदलापूर शहरासाठी स्वतंत्र धरणांची आखणी;बदलापूरकरांची पाणी समस्या सुटणार

बदलापूर, दि.२९,प्रतिनिधी:बदलापूर शहरातील वाढत्या पाणीप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. बदलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी तीन स्वतंत्र धरणांची आखणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नंबरवाडी, इंदगाव आणि चिंचवली या परिसरात नवीन धरणे बांधण्याचा प्रस्ताव असून, प्रत्येक धरणातून अंदाजे ५० ते ६० दशलक्ष लिटर पाण्याची उपलब्धता मिळणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
या कार्यक्रमात बदलापूर नगरपरिषदेला नव्याने मिळालेल्या मलवाहिनी स्वच्छता करणाऱ्या अत्याधुनिक यंत्रवाहनाचे लोकार्पण देखील झाले. त्या वेळी आमदारांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत बदलापूर शहरासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजनेची निविदा जाहीर केली जाईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या समस्येचा निराकरण करण्यात मदत होईल.
आमदार किसन कथोरे यांनी पुढे सांगितले की, केवळ धरणे बांधण्यापुरती भूमिका नाही तर बदलापूर शहराला स्वतंत्र पाण्याच्या दृष्टीने नियोजनही केले जात आहे, ज्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *