नवी मुंबई :माथाडी कामगार नेते चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून तुर्भे गाव येथे १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. नुकतीच या व्याख्यानमालेची सांगता डॉ. सी. वि. सामंत विद्यालयाच्या श्री रामतनु माता सभागृहात झाली. तुर्भे, तुर्भे गाव, कोपरी विभागातील ३५० विद्यार्थ्यांना तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या १९ वर्षांपासून ही व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. २७ जानेवारी रोजी चालू झालेल्या व्याख्यानमालिकेचा समारोप ३१ जानेवारी रोजी झाला. या वेळी माथाडी कामगार नेते चंद्रकांत पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका कविताताई पाटील,मुख्याध्यापक सुनिल कोळी, मुख्याध्यापक माळी सर आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.




