सानपाडावासियांची बेकरीच्या जीवघेण्या धुरापासून मुक्तता प्रशासनाकडून सानपाडा बेकरीतील लाकडी साठा सील
नवी मुंबई :सानपाडा सेक्टर सहामध्ये सानपाडा बेकरीमध्ये लाकडाचा इंधन म्हणून वापर होत असल्याने सभोवतालच्या परिसरातील रहिवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता.
त्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडून सानपाडावासियांच्या तक्रारीची दखल घेत पालिका अधिकाऱ्यानी बेकरीला भेट देत समस्येचे गांभीर्य लक्षात घेत बेकरीला नोटीस देवूनही नोटीसला न जुमानता बेकरीवाल्यांकडून बेकरीमध्ये लाकडे जाळली जात होती. धुराचा त्रास सानपाडावासियांना सहन करावा लागत होता. सानपाडावासी यांनी याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरताच पालिका अधिकाऱ्यांनी अखेर बेकरीतील लाकडी साठा सील केला आहे. अथक संघर्षानंतर सानपाडावासियांची बेकरीच्या जीवघेण्या धुरातून मुक्तता झाली आहे.
सानपाडा सेक्टर सहामध्ये असलेल्या सानपाडा बेकरीमुळे सानपाडा सेक्टर सहा व दहा तसेच सभोवतालच्या परिसरातील रहीवाशांच्या जिविताला धोका निर्माण झाला होता. सेक्टर दहामधील श्री गणेश कृपा सहकारी संस्थेने पालिकेकडे लेखी तक्रारही केली होती. तथापि सानपाडा बेकरीमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर होत असल्याने प्रचंड प्रमाणात धुराचे प्रदूषण होते. सोसायटीतील रहिवाशांच्या डोळ्यांना जळजळण्याचा त्रास जाणवत होता. वारंवार बेकरीवाल्या सांगून बेकरीवाल्यांकडून समस्यांबाबत निवारण केले जात नव्हते.
पालिका प्रशासन तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने रहीवाशांच्या समस्येचे गांभीर्य जाणून घेत पालिका सानपाडा-तुर्भे विभाग कार्यालयातील विभाग अधिकाऱ्यांकडे संपर्क करत त्यांना समस्या निवारण करण्याची विनंती केली. विभागातील अधिकारी मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी पाहणी केली असता, पाहणी अभियानात तेथील बांधकाम, इंधनासाठी वापरली जाणारी लाकडे निदर्शनास आली. चिमणी नावालाच असून रात्रीच्या वेळी बेकरीतील धूर परिसरात पसरुन रहिवाशांना डोळे चुरचुरणे, छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे आदी आजार वाढत असल्याचे यावेळी निदर्शनास आले व स्थानिक लोकांनीही बेकरीबाबत तक्रारींचा पाढा वाचला.
स्थानिकांनी बेकरीवाल्यांकडे यापूर्वी तक्रार केली असता, बेकरीवाल्यांने त्यांना न जुमानता काम चालूच ठेवल्याने प्रदूषणात वाढ होवून लोकांच्या जिवीतालाही धोका निर्माण झाला. सावंत यांनी विभाग अधिकारी कार्यालयाच्या पाहणी पथकाने पाहणी करुन बेकरीला नोटीस दिली. तथापि या नोटीसलाही न जुमानता बेकरीचालक साहित्य बनविण्यासाठी लाकडाचा इंधन म्हणून वापर करत होता. सानपाडावासियांना जीवघेण्या धुराचा त्रास होऊन फुफ्फुसाचा आजार वाढला होता.
सानपाडावासियांनी रविंद्र सावंत यांना संपर्क करताचा सावंत यांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत नोटीस देवूनही बेकरीवाला जुमानत नसल्याचा संताप व्यक्त केला. कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सानपाडा वासियांनी दिला. इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने बेकरीची झाडाझडती घेत बेकरीत असलेला लाकडी साठा सील केला व पुन्हा वापर केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने बेकरीचालकास दिला. बेकरीत आता लाकडाचा इंधन म्हणून वापर होत नसल्याने धुराच्या त्रासातून सानपाडावासियांची अखेर मुक्तता झाली आहे




