बदलापूर

बदलापूरमध्ये नगरपरिषदेचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा

बदलापूर, दि.२,प्रतिनिधी,बदलापूरमध्ये मागील काही वर्षांत नियमनाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात नगरपरिषदेला चांगलेच फटकारले आणि कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला होता, त्यामुळे बदलापूर नगरपरिषदेनी ही धडक मोहीम हाती घेतली आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील ४३७ अनाधिकृत बांधकामे पाडण्यात येणार आहेत.बदलापूर नगरपरिषदेने आज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कडक कारवाई सुरू केली आहे.नागरी विकास नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणारी ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार आहेत.ही कारवाई विशेषत: अंबरनाथ-बदलापूर आणि पनवेल हायवे भागात करण्यात आली.

पालिकेने यासंदर्भात यादी तयार केली आहे. नियमानुसार सर्व बेकायदा बांधकामे तोडली जातील.नगरपरिषदेचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पुढील ८-१० दिवस अशीच कारवाई शहरभर सुरु राहणार आहे. काही नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे, परंतु काहींना या निर्णयामुळे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे. या मोहीमेत नगरपरिषदेत हद्द कारमेल शाळा बदलापूर पूर्व पासून सुरुवात करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी पथक तयार करून १०० हुन अधिक नगरपरिषदेचे कर्मचारी, नगरपरिषद अधिकारी, अग्निशमन अधिकारी, पोलिस व सुरक्षा पथके तसेच जेसीबी यांच्या मार्फत करण्यात आली असल्याची माहिती नगरपरिषद मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *