अकोट:गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांच्या १०९ जयंती महोत्सवा अंतर्गत रोगनिदान व औषधोपचार शिबीर पार पडले. या शिबिरात तज्ञ डॉक्टर मंडळींनी ५०७ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला ,मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.
श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे संपन्न झालेल्या या आरोग्य शिबिरात संस्थेचे जेष्ठ विश्वस्त डॉ अशोकराव बिहाडे व डॉ संजीवनीताई बिहाडे यांचे मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टर मंडळींनी आपली सेवा घेऊन रुग्णांची तपासणी केली त्यामध्ये श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावतीचे डॉ शैलेश जायदे,अकोला अकोट येथील डॉ. अमोल रावणकर,डॉ. अपर्णा पखान ,डॉ. शुभांगी बिहाडे ,डॉ. प्रसन्न पुंडकर,डॉ. वैष्णवी पुंडकर ,डॉ. मनोज गावंडे ,डॉ. अभिनय झापे,डॉ. विनोद कोल्हे , डॉ. शितल गावंडे,डॉ. अभिजित पुंडकर ,डॉ. प्रतिक भेडे ,डॉ. राम बिहाडे ,डॉ. अमोल राजगुरू , डॉ. सुहास कुलट, डॉ. ऋतुजा राजगुरू,डॉ. विजय बिहाडे ,डॉ. संतोष पखान ,डॉ. दर्शन कुलट, डॉ. ऐश्वर्या कुलट आदींनी रुग्ण सेवा दिली.,डॉ. शिवाजीराव ठाकरे यांनी १५रुग्णाची एन्डोस्कोपी करुन रोग निदान केले.व संतकृपा हाॅस्पीटलचे वैद्यकीय टीम द्वारा ६५रुग्णाची तपासणी करून सेवा दिली.
गरजू रुग्णांच्या पुढील उपचारासाठी सवलतीच्या दरात सुविधा देण्यात येईल.या रुग्ण सेवेबद्दल डॉक्टर मंडळींचा संस्थेद्वारा यथोचित सन्मान करण्यात आला.
शिबीराचे यशस्वी संयोजनात राजुभाऊ कुकट,रविंद्र कापसे अनिल गोंडचर, उमेश चोरे, प्रकाश बिहाड,अनिल सावरकर, प्रशांत धाबे, निलेश काळे, रत्नाकर रेळे,शरद पांडे
,राममुर्ती वालसिंग,प्रविण वानखेडे,प्रविण चोपडे,अविनाश सावरकर, शरद झामरे,दिपक मेंढे,मदनराव देशमुख,रुपाली झामरे,श्वेता टिकार,सुवर्णा गोंडचर,आर्यन हिंगणकर, प्रणिता वानखेडे,अजय आखरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.





