मौदा:- मागील काही वर्षात ग्रामीण भागात असणाऱ्या मराठी माध्यमाच्या खाजगी अनुदानित आणि जिल्हा परिषद च्या शाळेची अतिशय दुरावस्था झालेली आहे पालकांचा इंग्रजी शाळा कडे वाढता कल या शाळेचा झगमगट मार्केटिंग करण्याची पद्धत आणि यामुळे आज इंग्रजी शाळेचा पिक हे काँग्रेस गवतासारखे ग्रामीण आणि शहरी भागात फोफाबळे आहे विशेष म्हणजे या शाळा पालकांकडून भरमसाठ फी घेऊन त्यातून आपला खर्च भागवत असतात या शाळांना कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान मिळत नसल्याने केवळ विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या फी मधून या शाळा चालविल्या जातात तसेच या शाळेत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन दिले जाते वाढती बेरोजगारी यामुळे आज डीएड बीएड झालेले अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये कमी पैशात अध्यापनाचे कार्य करत असतात तर दुसरीकडे कधीकाळी ग्रामीण भागाचे वैभव असणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळा या विद्यार्थी पटसंख्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे
2014 पासून शिक्षक भरती न झाल्याने आज अनेक शाळेत गणित इंग्रजी सारखे विषय शिकवणारे शिक्षक नाही प्रयोगशाळा सहाय्यक नाही शारीरिक शिक्षक नाही आज अनेक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक आपल्या वेतनातून थोडेफार पैसे जमा करून गावातील डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता बोलाविले जात आहे समायोजनाचे घोंगडे मागील चार-पाच वर्षापासून भिजत आहे आज उद्या अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन होईल आपल्या शाळेत अतिरिक्त शिक्षक येतील ही अपेक्षा अनेक शाळा व्यवस्थापकांना आहे परंतु हे समायोजन कायद्याच्या कचाट्यात नेहमी सापडत असल्याने मागील तीन-चार वर्षात हे समायोजन झालं नाही शहरातील काही शाळेत समायोजन झाले परंतु ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक यायला तयार नाही कारण अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन करताना हे शिक्षकाच्या मतानुसार शाळा निवडली जाते त्यामुळे बरेच शिक्षक नागपूर आतील शाळा निवडून त्या ठिकाणी समायोजित केले जातात एकीकडे मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे टिकली पाहिजे यासाठी राजकीय पक्ष ओरड करतात परंतु ठोस पावले उचलली जात नाही शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाते परंतु अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन तातडीने व्हावे व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळता यावे
याकरता कोणती शिक्षक संघटना बोलताना दिसत नाही त्यामुळे आज ग्रामीण भागातील मराठी शाळांची अस्तित्व धोक्यात आलेले एकंदरीत शिक्षक संघटनेची आंदोलनाची धार बोथड झाली नाही ना अशी शंका निर्माण होते आज अनेक शाळेत शाळेची घंटी वाजवणारा शिपाई नाही त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना तासिका बेल वाजविण्याची नाम मुश्किल आली आहे ग्रामीण भागात शिकणारे विद्यार्थी ही सामान्य घरची घरी बसतात त्यांचे पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असणारी भरमसाठ फी भरू शकत नाही त्यामुळे या शाळांमध्ये गोरगरीब सामान्य माणसाची मुले शिकतात यामुळे सर्वात जास्त नुकसान हे गोरगरीब विद्यार्थ्यांचे होत आहे परंतु शासन मात्र या समस्येकडे मागील चार-पाच वर्षात दुर्लक्ष करताना दिसत आहे ही बाब ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासासाठी अतिशय घातक आहे 2014 पासून अनेक शाळेत शिक्षक सेवानिवृत्त झाले पण त्या जागी नवीन शिक्षक भरती झाली नाही आणि शिक्षक भरतीचे आश्वासन नेहमीच दिले जाते पण प्रत्यक्षात मात्र ती होताना दिसत नाही त्यामुळे गोरगरीब लोकांचे पाल्य या शाळेत शिकतात त्या शाळा बंद करण्याचा डाव सरकारचा तर नाही ना असा प्रश्न अनेक पालकांनी उपस्थित केला आहे




