उल्हासनगर , दि ६ प्रतिनिधी : सद्या राज्यात अल्पवयीन मुली व महिला अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेत वाढ झाल्याने महाराष्ट्र शासना ने या प्रकरणी गंभीर दखल घेत स्पेशल सेल ची स्थापना केली असताना उल्हासनगर पोलीस परिमंडळ चार मधुन एकाच दिवशी दोन शाळकरी अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून मात्र हा प्रकार पोलीस विभागा साठी चिंते चा विषय बनला आहे.
हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक १५ वर्षाची शाळकरी मुलगी हिने आई ला सांगितले कि मी मित्राच्या घरी पार्सल आणण्या साठी जात आहे असे सांगून गेली परंतू ती काही वेळा ने घरी आली नाही. म्हणून आई वडिलांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेच सापडली नाही आई वडिलांनी त्यांच्या मित्र व नातेवाईकां जवळ चौकशी केली तिचा कुठे ही शोध लागला नाही. शेवटी हिल लाईन पोलीस ठाण्यात मुलीचा कुणी तरी अज्ञात इसमानी अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी केली आहे .
हा प्रकार बुधवारी ४ मार्च रोजी दुपारी घडला असून दुसरीकडे याच दिवशी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक अल्पवयीन मुलगी कॉलेज ला जात आहे असे सांगून घराचे बाहेर पडली परंतू ती संध्याकाळी घरी परतली नसल्याने चिंतेत असलेले आई वडिलांनी तिचा तिच्या मित्र मैत्रीण आणि जवळचे नातेवाईकां कडे शोध घेतला परंतू तिचा कुठे ही शोध लागला नाही . त्या मुलीच्या आई वडिलांनी थेट शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून कोणी तरी अज्ञात इसमाने त्यांच्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली असुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर पोलीस मुलीचा शोध घेत आहेत . या दोन्ही अल्पवयीन मुली एकाच दिवशी बेपत्ता झाल्याने पोलीस विभागा समोर चिंते चा विषय बनला असून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सदर च्या घटने ला गंभीरते ने घेत पोलीसांना त्या मुलींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.



