उल्हासनगर

उल्हासनगरात तहसिलदार कार्यालया कडुन विविध शासकीय दाखले वाटप

उल्हासनगर , दि . १५ प्रतिनिधी : उल्हासनगर ३ मध्ये प्रांत कार्यालय येथे शनिवार दि. १३ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय मार्फत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत विविध शासकीय दाखले वाटप या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या शिबिरात गोरगरीब नागरिक आणि दिव्यांग, अपंग. जेष्ठ नागरिक आणि संजय गांधी निराधार महिलांसाठी एका दिवसाच्या शिबिरात उत्पन्न दाखला, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, रहिवास दाखला, जातीचा दाखला, नाॅनक्रिमीलेयर दाखला, मातृ वंदना योजना, असे विविध शासकीय दाखले हे नागरिकांना आमदार कुमार आयलानी, महापौर अश्विनी निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार कल्याणी कदम, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला आहे . तसेच या शिबिरा प्रसंगी अमोल चव्हाण, राजेंद्र बोराडे, विलास शिंगाडे, नलिनी भोये, भाग्यश्री पायधन – वीर, प्रियंका पाटील, सुनिल सुर्यवंध, शरद सोनवणे, यांच्यासह शासकीय कर्मचारी वर्ग आणि समाज सेवक राजू तेलकर, किरण जाधव, यावेळी उपस्थित होते.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *