नागपूर जिल्हा रामटेक

तलावात उडी घेऊन २७ वर्षीय युवकाची आत्महत्या; रामटेक शहर हादरले

रामटेक ( प्रतिनिधी )दि. १९ मार्च ला रामटेक शहरातील राखी तलाव परीसरात सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, २७ वर्षीय युवकाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रामटेक शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव रोशन बबनराव ढोके, वय २७ वर्ष, रा. सुभाष वॉर्ड, रामटेक अशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोशन याला दारूचे व्यसन होते आणि तो कालपासून घरातून बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली होती.
दि.१९ मार्च ला सायंकाळी साधारण पाच वाजताच्या सुमारास राखी तलावात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ रामटेक पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह तलावातून बाहेर काढला.
सदर मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे पाठवण्यात आला असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे.
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणाचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *